आपण सर्वजण आपल्याघरी स्नानानंतर ज्यावेळी देवाची पूजा करतो, त्यावेळी आपल्याला जरी विधिवत् पूजा किंवा त्याचे मंत्र जरी ज्ञात नसतील, तरी निदान आपल्या कुलदेवतेचे ध्यान करून पूजा करता यावी म्हणून जे मंत्र उपलब्ध आहेत ते या ठिकाणी देत आहे. तरीही मंत्र शुद्ध म्हणता यावा म्हणून आपल्याकडे जेणारे जे पुरोहित(गुरूजी) आहेत त्यांना तो मंत्र म्हणून दाखवल्यास जास्त योग्य ठरेल.
श्री गणेश – एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं । पाशांकुशधरदेवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥ ॥श्री सिद्धिविनायकाय नम: ॥